औढा तालुक्यातील गोळेगाव फाटा परिसरात औंढा पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक जण राजबारच्या बाजूला आढळून आला. त्याला नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राम उर्फ सोनू तुळशिराम रावळ (रा. सुकापूर, ता. औंढा) असे सांगितले. यावेळी पोलिसांना त्याच्याजवळ १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख १९ हजार रुपये आढळून आले. पैसे व मोबाईलबाबत त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच पैसे व मोबाईलबाबत मालकी हक्क दाखविला नाही.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून राम उर्फ सोनू तुळशिराम रावळ याच्याविरूद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंद झाला आहे. पोह. ए. जी. पठाण तपास करीत आहेत.