लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : न.प.तील विषय समित्यांत सदस्यसंख्या ठरवून या सदस्यांची निवड आज करण्यात आली. आता सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये पक्षीय राजकारणातून मोठी ओढाताण होण्याची भीती होती. मात्र अगदी खेळीमेळीत ही निवड प्रक्रिया पार पडली.उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदींची उपस्थिती होती. पाच ते सहा नगरसेवकांची अनुपस्थिती दिसून येत होती. यात स्थायी समितीचे सभापती नगराध्यक्ष पदसिद्ध असतात. यात सदस्य म्हणून इतर सर्व सभापती तर जितसिंग साहू, शेख निहाल, गणेश बांगर या तिघांना नगरसेवकांतून संधी मिळाली. उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असतील, असे ठरले. या समितीवर स.नाजनीन जावेद, छाया बिरजू यादव, उषाताई धबाले, आनंदा खंदारे, अर्चना भिसे, मो.आरेफ, सुषमा कदम, दिनेश चौधरी यांची निवड केली आहे.इतर समित्यांची सभापतीनिवड बाकी असली तरीही सदस्यसंख्या निश्चित करून सदस्य निवड झाली. यात बांधकामवर शे.तैबुन्नीसाबी शे. खलील, छाया यादव, वसंताबाई लुंगे, बागवान अ.माबूद, ज्योती कुटे, मो.आरेफ, श्रीराम बांगर, अनिता गुठ्ठे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीवर सुनील भुक्तर, स.आमेरअी, कय्युम पठाण, मो.आरेफ, विशाल गोटरे, अ.माबूद बागवान, सुषमा कदम, अनिता गुठ्ठे यांची निवड केली.सदस्यसंख्या : राकाँ व शहर विकासचे वर्चस्वस्वच्छता, वैधक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर शे.तैबुन्नीसाबी शे.खलील, शे. आरेफ, स.आमीरअली, आनंदा खंदारे, शे.यास्मीन बेगम, विशाल गोटरे, संदीप मुदिराज, लताबाई नाईक यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीत कय्यूम पठाण, स.आमेरअली, सुनील भुक्तार,माबूद बागवान, नरसिंग नायक, विशाल गोटरे, लताबाई नाईक, नीता बांगर यांचा समावेश आहे. तर महिला व बालकल्याणवर अनिता सूर्यतळ, वैशाली गोटे, स.नाजनीन, शेख यास्मीन, अर्चना भिसे, ज्योती कुटे, प्रीती अग्रवाल व नीता बांगर यांचा समावेश आहे.सदस्यसंख्या निश्चिती व निवडीनंतर आता लवकरच एकूण पाच समित्यांच्या सभापतीची निवड केली जाणार आहे. आगामी सात दिवसांत यासाठी सभा घ्यावी लागणार आहे.
विषय समिती सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:53 PM