हिंगोली : सामाजिक न्यायाच्या, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन बचत गटांनी स्वतःला स्वयंसिद्ध केले पाहिजे, असे मत समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात २२ जून रोजी स्टॅंड अप इंडिया मार्जिन मनी योजनेसंदर्भात बचत गट सदस्यांसाठी संवाद चर्चा सत्र घेण्यात आले. याप्रसंगी सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे बोलत होते.
यावेळी एम. आर. राजुलवार, बार्टीचे प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे, धान फाउंडेशनचे व्यवस्थापक अनिल दवणे, आदींची उपस्थिती होती. शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसलेल्या नवउद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी हिश्श्यातील १५ टक्के मनी भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बचत गटांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी प्रस्तावही दाखल करावेत, असे आवाहनही शिवानंद मिनगिरे यांनी केले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून चर्चासत्रास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले. आभार समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. यावेळी समतादूत प्रफुल पट्टेबहादूर, रेखाबाई साठे, पंचशीला भुक्तर, प्रियंका इंगळे, रेखा जहीरव, गंगासागर खिल्लारे, कांताबाई पद्मने, वंदना घोंगडे, नंदाबाई वैद्य, गंगासागर बलखंडे, उज्ज्वला कांबळे, शीला खंदारे, अनिता अनिल कांबळे, उमेश राऊत, अनुसया कानडे, रंजना मस्के, बेबी दीपके, रवी ठोके, धारू वाघमारे, दामोदर इंगोले, माधुरी पठाडे, छायाबाई पडघन, आदी जिल्ह्यातील महिला व पुरुष बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :