जवळा बाजार येथील गजानन एजन्सीवर सोयाबीनचे बियाणे चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार कृषी अधीक्षक कार्यालयाने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक हिंगोली व मंडळ कृषी अधिकारी शिरडशहापूर यांनी गजानन एजन्सी जवळा बा. या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. तेव्हा या तपासणी अहवालात विविध त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे गजानन एजन्सीचा बियाणे विक्री परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार कृषी अधीक्षक व्ही.डी.लोखंडे यांनी २४ जूनपासून ५० दिवसासाठी हा परवाना निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.
...तर तक्रार दाखल करण्याचे आवाहन
जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके अशा कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठा ठरवून दिलेल्या कमाल दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास त्या खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.