लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा तालुक्यातील जवळा बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथील भारतीय स्टेट बँकेत खातेधारकांची संख्या वीस हजारांच्या आसपास आहे. परिसरातील जवळपास ७० ते ८० गावांचा आर्थिक व्यवहार येथील भारतीय स्टेट बँकेतूनच चालतात.सोमवारी सकाळपासूनच बँकेचे सर्व्हर बंद पडल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प झाले होते. येथे ही एकमेव राष्टÑीयकृत बँक आहे. त्यामुळे खातेधारकांची संख्याही मोठी आहे. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांचे खाते या बँकेत असल्यामुळे पेरणीसाठी पैसे मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच शेतकºयांचे कृषी कर्ज खातेही मोठ्या प्रमाणात या बँकेत आहे. तर कृषी केंद्रचालक, व्यापारी सकाळपासून बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावत होते. मात्र सर्व्हर बंद असल्यामुळे सर्वच व्यवहार सायंकाळपर्यंत ठप्प झाले होते. सर्व्हर सुरळीत होईल या आशेवर ग्रामस्थ संध्याकाळपर्यंत बँकेत बसून होते. मात्र सेवा सुरळीत झाली नसल्याने खातेदार कंटाळून घरी परतले. बँकेचे व्यवस्थापक हे अनेक दिवसांपासून आजारी रजेवर आहेत. प्रभारी व्यवस्थापक मुकाडे म्हणाले, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार आहे. सायंकाळपर्यंत कुठलाही तंत्रज्ञ येथे फिरकलासुध्दा नाही.
सर्व्हर बंद; बँकेचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:54 AM