दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील दहावीपेक्षाही कमी शिक्षण घेतलेल्यांचेच प्रमाण अधिक आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील शपथपत्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ७ उमेदवार हे पदवीधर आहेत. तर चार उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे ४ उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. दोन उमेदवार बारावी दोन दहावी उत्तीर्णच आहेत. राजकीय पक्षांपैकीही ११ पैकी पाच उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत.कला शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला व विज्ञान विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत १७.८ टक्के उमेदवार हे कला पदवीधर तर १४.२८ टक्के उमेदवार हे विज्ञान विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ३२.१४ टक्के इतके आहे.्रमतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ?... तरच उमेदवार सर्वांगीण विकास करेलउच्चशिक्षित असलेला उमेदवार विकास कामे करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. तो विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ शकतो. नेमकी कोणती विकास कामे करायची, याची जाण सुशिक्षित उमेदवाराला असते. -प्रकाश नेतनेसुशिक्षित उमेदवाराला दूरदृष्टी असतेलोकसभेत प्रतिनिधीत्व करणारा उमेदवार हा सुजाण आणि सुशिक्षित असावा. कारण सुशिक्षित उमेदवार लोकसभेत विविध प्रश्न व्यवस्थित मांडू शकतो. शिवाय सुशिक्षित उमेदवारास दूरदृष्टी असते. नेमकी कुठली विकास कामे करावीत, याची जाण त्याला असते. - अरूण जाधवविकास कामांना अधिक महत्त्व आहेसुशिक्षित उमेदवारच विकास कामे करू शकतो, हा भ्रम आहे. काही वर्षापुर्वीचा निवडणुकीचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळी असलेल्या उमेदवारांचे शिक्षण काहीच नसल्याचे दिसून येईल. परंतु त्यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे शिक्षित उमेदवारच विकास करतो असे नाही.- हरिश कीर्तीवार
सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:08 AM