लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली: अखिल भारतीय काँग्रेसचे शिष्टमंडळ ९ व १० जुलै रोजी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौºयात गुजरात राज्याचे प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांचा समावेश आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे मार्च २०१८ ला सिंगापूर सरकारच्या निमंत्रणावरुन तेथे गेले होते. त्यावेळेस सिंगापूर सरकारने राहुल गांधी यांना काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाला सिंगापूर येथील विविध उपक्रमाच्या अभ्यासासाठी पाठविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने काँग्रेसचे शिष्टमंडळ सिंगापूर रवाना झाले असुन या शिष्टमंडळात माजी केंद्र्रीयमंत्री मिलिंद देवरा, अ.भा काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी खा.राजीव सातव, पश्चिम बंगालचे प्रभारी खा.गौरव गोगाई, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सुष्मिता देव, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस शर्मिष्ठा मुखर्जी, राष्ट्रीय प्रवक्ता खुशबु यांचा समावेश आहे.या दौºयात ते सिंगापुरचे उपपंतप्रधान थर्मन षणमुगरत्नम तेथील लोकसभेचे सभापती व परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्णन यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच सिंगापूर येथील जल व्यवस्थापन, अर्बन डेव्हलेपमेंट संदर्भात देखील त्या खात्याच्या मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. कौशल्य विकासात सिंगापूरने केलेली कामगिरी बाबत माहिती घेतली जाणार आहे.
सातव शिष्टमंडळात सिंगापूरला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:20 PM