इस्माइल जाहागीरदार,
वसमत ( जि. हिंगोली) :तालुक्यातील अनेक गावांना रविवारी सकाळी ८.१२ वाजेदरम्यान भुगर्भातुन आवाज आला. २०२३ या वर्षातील हा दुसरा धक्का आहे. तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने ही यास दुजोरा दिला आहे.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव वसमत, कळमनुरी आणि औंढा या तीन तालुक्यांसाठी केंद्रबिंदू मानले जाते.सात वर्षांपासून पांगरा शिंदे या गावी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी भूकंपाची नोंद होते तर कधी नोंद होत नाही. परंतु घबराट मात्र नागरिकांमध्ये सुरू आहे. यावर्षी ८ जानेवारी रोजी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद आहे.याच वर्षातील हा दुसरा धक्का मानला जातो. परंतु ५ फेब्रुवारीचा धक्का सौम्य असल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले.तिन्ही तालुक्याना वारंवार भुकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीकात भीती निर्माण झाली आहे.
वसमत तालुक्यातील वसमत, कुरुंदा,पार्डी खुर्द,पार्डी बा. गिरगाव,कवठा,वर्ताळ,डोणवाडा,सेलु,पार्डी, कोठारी,पांग्रा शिंदे,वापटी,कुपटी,शिरळी यासह औढानागनाथ,कळमनुरी तालुक्यातील आदि गावांना ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ वा.दरम्यानात भुगर्भातुन आवाज येत जमीन हादरली आहे.
५ फेब्रुवारी रोजी जाणवलेल्या भुकंपाच्या सौम्य धक्कयात कोठे हानी व नुकसान झाली नसली तरीही नागरीक भयभित झाले आहे, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ वा.दरम्यानात भुकंपाचा धक्का जाणवला आहे,महिना भरात हा दुसरा धक्का आहे,तालुक्यात कुठे नुकसान व हानी झाली नाही.भुकंपाचा सौम्य धक्का होता.याची नोंद झाली नाही ,- अरविंद बोळंगे, तहसिलदार वसमत,