लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे कार्यरत जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त निलेश शेवाळकर यांनी त्यांच्या ६ मित्रांसह अतिशय कठीण असलेला एव्हरेस्ट बेस कँप नुुकताच पुर्ण केला. नेपाळमधील लुकला येथून त्यांची ट्रेकींगची मोहीम सुरु झाली व १२ दिवसांमध्ये त्यांनी बेस कँप (५३६४ मी) ट्रेक पुर्ण केला व बेस कँप जवळील काला पत्थर हा ५६४८ मिटर ऊंचीचा पर्वत सर केला. त्यांच्या कामगिरीमुळे हिंगोली व परभणी जिल्ह्यात त्यांचे कौतूक होत आहे.ट्रेकींगची आवड असलेले शेवाळकर हे सह्याद्रीत नेहमीच ट्रेक करतात. माऊंट एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक करताना शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक दृष्ट्या कणखर असणे महत्वाचे असल्याचे शेवाळकर यांनी सांगीतले.बेस कँप ट्रेक करताना खराब वातावरण, उणे १५ ते २० अंश सेल्सियस तापमान, अधिक उंचीवर ५० टक्केच असलेले आॅक्सीजनचे प्रमाण, अल्टीट्युड सिकनेस अशा विविध आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.एव्हरेस्ट बेस कँप जाण्याचे स्वप्न पाहणारांनी नियमित किमान दहा किमी चालणे, सायकलींग आदीचा सराव करावा. सह्याद्रीत जमतील तेवढे जास्त ट्रेक करावेत व नियमित व्यायाम करण्याचा सलाही त्यांनी दिला. ट्रेकला त्यांच्या सोबत गणेश बिरादार (पोलीस उपअधिक्षक), धनराज पांडे (स.संचालक), आदिनाथ दगडे (जिल्हा उपनिबंधक), अॅड. सचिन रणदिवे बबन हैबततपुरे व मोहन पटेल हे सर्व मित्र होते.अशी घ्यावी काळजी४सदरील ट्रेक शिस्तीत करावा लागतो, अतिउत्साह हा जिवावर बेतु शकतो. तेथे संरक्षणासाठी थर्मल्स, ऊबदार कपड्यासह आदी साहीत्य लागते व आहार, चालणे आदी शिस्त पाळावी लागते. असे शेवाळकर यांनी सांगिंतले.
शेवाळकर यांनी केला एव्हरेस्ट बेस कँप सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:21 AM