लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.जानेवारी २0१६ ते डिसेंबर २0१७ या दोन वर्षांतील संग्रहातून निवड केली. यावर्षी मान्यवरांनी शिफारस केलेल्या एकूण एकूण तेरा संग्रहामधून ही निवड केली आहे. या समितीमध्ये डॉ. रणधीर शिंदे, रमेश इंगळे उत्रादकर, डॉ. आसाराम लोमटे, प्रा इंद्रजित भालेराव, प्रा हनुमान व्हरगुळे प्रा भगवान काळे, डॉ. केशव खटिंग यांचा समावेश होता. या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार दिनानाथ मनोहर, गोविंद काजरेकर, कृष्णांत खोत, दिनकर मनवर, सिताराम सावंत, या साहित्यिकांना मिळाला आहे, असे संयोजन मंडळाचे प्राचार्य के. एस. शिंदे यांनी सांगितले.वीजेचा अपव्ययहिंगोली - जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विद्युत उपकरणे आवश्यकता नसतानाही सुरूच असतात. परिणामी वीजेचा अपव्यय होत आहे. शासनाकडून वीज बचतीचा संदेश दिला जात असला तरी प्रत्येक्षात मात्र शासकीय कार्यालयात वीजेचा अपव्यय होतानाचे चित्र आहे.
शिलेदार यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:48 PM