मुंबई - राजकीय नेत्यांच्या घरचा कार्यक्रम किंवा सोहळा म्हटलं की थाटमाट आणि दिमाखदारपणा आला. अतिशय निटनेटकेपणा फाईव्हस्टार चकाकी दिसून येते असते. मात्र, आजही काही आमदार, राजकीय नेत्यांच्या घरचे कार्यक्रम हे रितीरिवाज आणि पारंपरिक पद्धतीनेच चालतात. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुलाच्या लग्नावेळी घरातील कार्यक्रमात पारंपरिक नृत्यावर ठेका धरला होता. आता, हिंगोलीतीलआमदार संतोष बांगर यांच्या वडिलांनी चक्क तलवार फिरवल्याचा व्हिडिओ स्वत: आमदार बांगर यांनीच शेअर केला आहे.
आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते. औषधांचा तुटवडा हीसुद्धा गंभीर समस्या बनली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचं मानून आमदारांनी आपलं कर्तव्य दाखवून एक आदर्शन निर्माण केला. या घटनेची माध्यमांनी दखल घेतल्याने आमदार बांगर चर्चेत आले होते. तर, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादात उडी घेत त्यांनी नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढू, अशी धमकी दिल्यानेही ते अनेकांना परिचीत बनले होते. आता, आमदार बांगर यांनी त्यांच्या 88 वर्षीय वडिलांचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
नारायण राणेंबद्दल काय म्हणाले होते
'नारायण राणेंना मला संदेश देयचा आहे. कुठे येयचे कुठे येयचे ते तुम्ही काय सांगता, तुमच्या घरामध्ये एकट्याने घुसून चारीमुंड्या चित्त करेल, पोलीस प्रोटेक्शन बाजूला केले तर कोथळा बाहेर काढण्याची ताकद आमच्यात आहे', असे प्रक्षोभक विधान शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंगळवारी आंदोलनात हिंगोली येथे केले. शिवसेना- भाजप यांच्यातील संघर्षाने राज्यातलं वातावरण चांगलेच तापलेले असताना आमदार बांगर यांनी नारायण राणे ( Narayan Rane ) यांना थेट मारण्याची धमकी होती.