अडचणी वाढल्या
मागील आठ ते दहा दिवसांत औषधे उपलब्धतेच्या समस्या येत आहेत. आम्ही शक्य तेवढ्या उपलब्ध करतो. उर्वरित नातेवाइकांना आणावे लागते.
डॉ. सचिन बगडिया, खासगी कोविड सेंटर संचालक
पुरवठाच नाही.
औषधे प्रतिदिवस मागणी पुरवठा
रेमडेसिविर ४८० १२०
फेव्हीपिरॅव्हीर २०० १००
हिपॅरिन lmw ४०० ०००
एमपीएस ८०० ०००
नातेवाइकांची घालमेल
माझे आजोबा दहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. ते ऑक्सिजनवर आहेत. गंभीर आहेत. अजून रेमडेसिविर मिळाले नाही. आता एनआयव्ही मास्कही बाहेरून आणावा लागतोय.
-सुनील कऱ्हाळे, गिरगाव
माझे कुटुंबीय १३ दिवसांपासून दाखल आहेत. रेमडेसिविर येथे नव्हते, तर बाहेरून आणले. त्यात वेळ गेला. परजिल्ह्यात जावे लागले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दिनेश घुगे, हिंगोली
दहा ते बारा दिवसांपासून वडील जिल्हा रुग्णालयात भरती आहेत. रेमडेसिविर सोडा, एलएमडब्ल्यू व एमपीएस हे इंजेक्शन येथे नाही. बाहेरही मिळत नाही. आता ते आणायचे कुठून?
- वैभव जाधव, सेनगाव
माझे काका खासगी कोविड सेंटरमध्ये पंधरा दिवसांपासून आहेत. तेथेही काही औषधे नसल्याने बाहेर जावे लागते. बाहेरही काही औषधे मिळत नाही.
-आशिष बांगर, हिंगोली