लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील काही वर्षांपासून सातत्याने कापसाचे क्षेत्र घटत चालले आहे. आता पुन्हा त्यात तब्बल २0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे हळद, कारळे आदी पिकांकडेही शेतकरी पाठ फिरवतील, असा अंदाज आहे.गेल्या वर्षी लाल बोंडअळीने बीटी कापसालाही सोडले नाही. ही अळी मोठ्या प्रमाणात पडल्याने कापसाचे पीक अर्ध्यातच मोडून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शिवाय त्याचे पंचनामे झाल्यानंतर साधी मदतही मिळाली नाही. गतवर्षी बीटी कापूस घेतलेल्यांना फरदडही घेता आला नाही. मात्र यंदाही बोंडअळीने आक्रमण केले तर सतत दुसºया वर्षीही एकप्रकारे नापिकीलाच सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे गतवर्षीच्या ५४ हजार ६0५ हेक्टरहून ४३ ६८४ हेक्टरपर्यंत कापसाचे क्षेत्र येवू शकते. तर सोयाबीनचे क्षेत्र गतवर्षीच्या २.२८ लाख हेक्टरवरून २.३0 लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. तर तुरीचे क्षेत्र ४१ हजार ५३५ हेक्टरहून ४६ हजार ९९७ हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. खरीप ज्वार दहा हजार हेक्टर, बाजरी-७८ हेक्टर, मका २६२३ हेक्टर, मूग १२ हजार ४७४ हेक्टर, उडीद ८0९२ हेक्टर अशी पेरणी होणे अपेक्षित आहे. तर तीळ २३१ हेक्टरवर घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. यंदा चांगल्या पर्जन्याचा हवामान खात्याने दावा केल्याने ४ हजार हेक्टरवर नवीन लागवडीची चिन्हे आहेत.सर्वसाधारण क्षेत्र ३.४0 लाख हेक्टर असून ३.८६ लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी खात्याने बांधला आहे. तर बियाणांचेही नियोजन केले आहे.
यंदा पुन्हा कापसाचे क्षेत्र घटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:51 AM