नगर परिषदेस एकूण ६ डीपीआर (प्रकल्प अहवालास) केंद्र व राज्य शासनाची मंजुरी दिलेली आहे. ज्यामध्ये एकूण १ हजार ९८ घरकुले मंजूर आहेत. याकरिता २७.४५ कोटी मंजूर असून त्यापैकी ११.६६ कोटी निधी हिंगोली नगर परिषदेस प्राप्त झाला होता. यापैकी ९५८ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली. यामुळे त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहेत. सदरील मंजूर लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी ४० हजार रुपयेप्रमाणे ६७४ लाभार्थ्यांना २ कोटी ६९ लाख दुसऱ्या हप्त्यापोटी १ लाख रुपयांप्रमाणे ६२९ लाभार्थ्यांना ६ कोटी २९ लाख, तिसऱ्या हप्त्यापोटी ६० हजार रुपये याप्रमाणे ५६२ लाभार्थ्यांना ३ कोटी ३७ लाख आणि चौथ्या हप्त्यापोटी ५० हजार रुपयांप्रमाणे ४६० लाभार्थ्यांना २ कोटी ३० लाख असे प्राप्त झालेले १४ कोटी ६६ लाख आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. त्यातून आजपर्यंत एकूण ६०० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
६ डीपीआरव्यतिरिक्त नवीन ३ डीपीआर शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये प्रकल्प अहवाल क्र. ७ मधील लाभार्थीसंख्या ४२१, प्रकल्प अहवाल क्र. ८ मधील लाभार्थीसंख्या १८८ आणि प्रकल्प अहवाल क्र. ९ मधील लाभार्थीसंख्या ५९७ एवढी आहे, त्यानुसार १ हजार २०६ पात्र लाभार्थी यांना घरकुल बांधकामाकरिता कार्यारंभ देण्याची कार्यवाही नगर परिषद कार्यालयाच्या वतीने सुरू आहे, सदरील नवीन मंजूर झालेल्या ३ डीपीआरकरिता केंद्र शासनामार्फत १८ कोटी ९ लाख व राज्य शासनामार्फत १२ कोटी ६ लाख असे एकूण ३० कोटी १५ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे बाकी आहे.