- दयाशील इंगोले हिंगोली : रस्ताच नसलेल्या करवाडी गावात वाहन नसल्याने अडीच वर्षाच्या मुलीला सोमवारी अचानक झटके येऊ लागल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तब्बल सहा किलोमीटर चिखल तुडवत रुग्णालयात दाखल केले. देशभरात एकीकडे कोट्यवधी रुपयांचे रस्ते होत असताना ग्रामीण भागात मात्र रस्त्यांअभावी किती हाल होतात, हे या घटनेने समोर आले.मजुरी करणारे पांडुरंग कºहाळे यांची मुलगी तेजस्वीनीला सकाळी आठ वाजता अचानक झटके येऊ लागले. गावासाठी रस्ताच नसल्याने वाहन कसे मिळणार? अखेर भर पावसात ६ किमी चिखल तुडवित तब्बल सव्वा तास पायपीट करत पांडुरंग व पत्नी सुनीताबाई यांनी तेजस्वीनीला बोल्डा आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार तिला हिंगोली जिल्हा रूग्णालयात दाखल केले.करवाडीवरून नांदापूरपर्यंत सहा किमी आम्ही पायीच चाललो. चिखलात पाय फसत असल्याने सव्वातास लागले. नांदापूरच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नाही. त्यामुळे वाहनाने सात किमीवर बोल्डा गावात खाजगी दवाखान्यात गेलो. तेथून हिंगोलीला आलो.
सहा किलोमीटर चिखल तुडवीत चिमुकलीला घेऊन गाठले रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:31 AM