हिंगोली: पुढील पाच दिवसांमध्ये आकाश स्वच्छ व ढगाळ राहील. येत्या २४ तासांमध्ये किमान तापमानात फारसा बदल न होता त्यानंतर किमान तापमानात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हरभरा पीक फुले आणि घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के एनएसकेई निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पीक वाढीच्या अवस्थेत असून करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यासाठी डायमेथोट ३० टक्के १३ मिली किंवा असिफेट ७५ टक्के १० ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून पाचट जाळू नये. नवीन लागवड केलेल्या ऊस पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
संत्रा, मोसंबी पीक फळवाढीच्या अवस्थेत आहे. संत्रा, मोसंबी बागेत ००:००: ५० हे १५ ग्राम प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृग बहार संत्रा, मोसंबी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. संत्रा, मोसंबी बागेत तण नियंत्रण करावे. डाळिंब पीक काढणीच्या अवस्थेत असून काढणीस तयार असलेल्या डाळिंबाची काढणी करून घ्यावी, चिकू पीक हे वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत आवश्यकतेनुसार त्याचे व्यवस्थापन करावे.
काढणीस आलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी व फूल पिकात तण नियंत्रण करून व्यवस्थितरित्या पाणी व्यवस्थापन करावे, याचबरोबर भाजीपाला वाढीच्या अवस्थेत असून मिरचीमध्ये रसशोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसूृन येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सिफेन १० टक्के इसी ४ मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन १० टक्के ईसी ४ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मागील काही दिवसांपासून चारा वाढीच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या चाऱ्याला ३० दिवस झाले असतील तर ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. तसेच पाणी व्यवस्थापन करून घ्यावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.