शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

हिंगोली जिल्ह्यात हत्ता, घोरदरी येथे उभा राहणार सौर कृषी वीज केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 6:01 PM

हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

हिंगोली : हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात २0१७ सिद्धी ते २0१८ संकल्प या विषयावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, अति.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अति.मुकाअ ए.एम. देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, माहिती अधिकारी सूर्यवंशी आदीसह विविध विभागांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यापूर्वी झालेली वैशिष्ट्यपूर्ण कामे व आगामी काळातील संकल्पांविषयी यात माहिती देण्यात आली. यावेळी भंडारी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे. महानिर्मितीमार्फत हे काम केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी चार हेक्टर जागा लागणार आहे. लवकरच गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जाणार आहे.यावेळी जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हैत्रेवार म्हणाले, कर्जमाफीचे आॅनलाईन १.०९ लाख अर्ज प्राप्त झाले. ३५ हजार ६३७ शेतकर्‍यांना ११७.३४ कोटी मंजूर झाले. यापैकी २९ हजार ५६ शेतकर्‍यांचे ८५.९१ कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले. तर पूर्वी तीन बाजार समितीत लिलाव व्हायचा. आता सर्वच बाजार समित्यांत लिलाव होत आहे. उपबाजारपेठांमध्येही ही सुविधा केली जाणार आहे. ८५ सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण केले जाणार आहे. तर हिंगोली व सेनगाव बाजार समितीचा ई-नाममध्ये सहभाग होईल.वनविभागाचे केशव वाबळे म्हणाले, अंजनवाडा गावच्या वन समितीस राज्य स्तरावरील चौथा पुरस्कार मिळाला. तर तेंदूच्या ११ घटकांतून २.१६ कोटींचा महसूल मिळाला. बोनस ३८.३४ कोटी वाटप केला जात आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानाबद्दल १५00  शेतकर्‍यांना १४.१५ लक्ष रुपये वितरित केले आहेत. अतिक्रमण निर्मूलनात ६0५ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमणे काढली.कृषी अधीक्षक विजय लोखंडे म्हणाले, यांत्रिकीकरण योजनेत २७६ ट्रॅक्टर व २१६ अवजारे वितरित केले. ८0 सामूहिक शेततळे घेतले आहेत. तर ठिबक व तुषार सिंचनासाठी १0 कोटी मिळाले आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत दहा गावांची निवड झाली असून शेती सिंचन व जोडव्यवसायासाठी ही योजना आहे. सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, उमरदरी या गावांत पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.

रेशीम लागवडीत जिल्हा दुसरा रेशीम अधिकार्‍यांनी हिंगोली जिल्हा रेशीम लागवडीत राज्यात दुसरा असल्याचे सांगितले. यात २00 एकरचे उद्दिष्ट असताना ७८८ एकरवर लागवड झाली. तर येत्या दोन वर्षांत २ हजार हेक्टरवर लागवड नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी भंडारी यांनी आगामी काळात रेशीम उत्पादकांना गटशेतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाय ६८४ गावांचे आॅनलाईन सातबाराचे काम झाले असून १३ गावे शिल्लक राहिल्याचे सांगितले. तर हस्तलिखिताप्रमाणे सातबारा नसल्यास त्याची अजूनही दुरुस्ती करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

दोन तालुके हागणदारीमुक्तसीईओ एच.पी. तुम्मोड म्हणाले, स्वच्छ भारत योजनेत १.८१ पैकी १.६१ लाख कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले. हे काम ९१.१४ टक्के एवढे आहे. ५६३ पैकी ३९६ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. हिंगोली व औंढा हे दोन तालुके हागणदारीमुक्त झाले. २0 जानेवारीपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. घरकुल योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा आहे. तर लोकवाट्यातून १00 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांना १४ व्या वित्त आयोगातून सोलार पॅनल देता येणार आहे.

टॅग्स :WaterपाणीmahavitaranमहावितरणHingoliहिंगोली