सध्या ग्रामपंचायतची आचारसंहिता असल्यामुळे हे प्रस्ताव निकाली काढता आले नाहीत. आचारसंहिता संपताच हे प्रस्ताव निकाली काढण्यात येणार आहेत. निवड श्रेणी मिळविण्यासाठी तीन वर्षांचे गोपनीय अहवाल, शैक्षणिक अर्हता वाढविली, निवड श्रेणी प्रशिक्षण याबाबतची तपासणी शिक्षण विभागाने केली आहे. या सर्व प्रस्तावांची तपासणी करण्यात आली असून, सध्या आचारसंहिता असल्यामुळे हे प्रकरण निकाली काढता आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर हे प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे. ४९५ प्रस्तावांपैकी २० टक्के शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेमधून आतापर्यंत एकाही शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ देण्यात आलेला नव्हता. ग्रामपंचायतची आचारसंहिता संपताच या शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढून त्यांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सांगितले. चोवीस वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात येतो.
आचारसंहिता संपताच शिक्षक निवड श्रेणीचे प्रस्ताव काढणार निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:39 AM