लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तसेच शहरातील नागरिकांनाही ताजा व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला शोधूनही सापडत नाही. शहरातील ग्राहकांचा संबंध थेट शेतकºयाशी आला तर शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. विक्रीसाठी मध्यस्थी व्यापाºयांचा संबंधच येणार नसल्याने ते पैसे शेतकºयांनाच मिळणार आहेत. या उद्देशाने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकºयांना भाजीपाला विक्रीसाठी काही ओटे बनविण्यात येणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच ही सुविधा शेतकºयांसाठी चालू करण्यात येणार असल्याचे आत्मा केंद्राचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे यांनी सांगितले. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागते. त्यामध्ये वेळही अधिक जातो.शेतीचे इतर कामे सोडून शेतमाल विक्री करणे शेतकºयाला परवडत नाही. त्यामुळे शेतमाल चांगल्या किंमतीत विक्री करणे ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरते आहे. शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला माल व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करुन चढ्या दराने त्याची विक्री करतात. त्याचा भुर्दंड शेतकºयांसह ग्राहकांनाही सहन करावा लागतो. ही बाजारपेठ सुरु झाल्यास ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे.मार्चमध्ये सुरु होणार बाजारपेठजिल्ह्यात आत्मा केंद्राचे १२९७ शेतकरी गट आहेत. या गटांत जवळपास १३ ते १५ हजार शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याअखेर बाजारपेठ सुरु होणार असल्याचे आत्माचे युवराज शहारे यांनी सांगितले.केवळ शेतकºयांसाठीच असणार बाजारपेठकृषी अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यालगत २० बाय १५ आणि ३० बाय २० या आकाराचे दोन शेड व ओटे उभारण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ही बाजारपेठ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांसाठी असणार आहे. त्यामध्ये आत्मा गटांच्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधीक्षक कार्यालयासमोरील जागा दर्शनी भागात आहे. येथे शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असतो. त्याचा फायदा या बाजारपेठेला होणार आहे. शेतकºयांनी उत्पादित केलेला सर्वच माल येथे विक्री करता येणार आहे.
आत्मा उपलब्ध करणार भाजीपाला विक्रीची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:55 PM