लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ंनाफेडच्या हमीभाव केंद्रावर मालाची विक्री करणाºया शेतकºयांची दैना काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. तीन महिने प्रतीक्षा करून निवेदनबाजी, उपोषणे केल्यानंतर हे वाटप तर सुरू झाले मात्र काही सोयाबीन उत्पादकांना अर्धवट रक्कमेचे धनादेश आल्याने त्यांनी ते घेण्यास नकार दिला.हिंगोली येथील बाजार समितीत खरेदी विक्री संघाने चालविलेल्या नाफेडच्या केंद्रावर उडीद व मुगाच्या खरेदीत अनियमितता झाल्याची तक्रार झाल्यानंतर हे खरेदी केंद्र तर बंद पडले. शिवाय चौकशीचा ससेमिरा मागे लागला होता. यात नोंदणीपासून ते सर्वच प्रक्रिया करताना मोठी दिरंगाई झाली. शेवटी शेतकºयांनी माल दिला असल्याने त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने शासनाचे याकडे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधींचाही तगादा सुरू झाला होता. त्यानंतर शेतकºयांची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेताना काही अटी घातल्या होत्या. मात्र तोपर्यंत ज्यांची प्रक्रिया योग्यरीत्या झाली अशांची रक्कम अदा करण्यास आदेशित केले होते. आजपासून त्याचे वाटप सुरू झाले आहे. या ठिकाणी १२२ शेतकºयांनी ४0३२ क्ंिवटल सोयाबीनची विक्री केली आहे. यासाठी जवळपास १.२३ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र अवघे ६५ लाख रुपये मिळाले आहेत. यातील शेतकºयांची रक्कम व यादीही वरूनच आली आहे. यात अशोक पुरी यांनी २0 क्ंिवटल सोयाबीन विकल्यावर ६१ हजार मिळणे अपेक्षित असताना ६९१५ रुपये मिळाले. नारायण महादू जगताप यांनी २५ क्ंिवटल सोयाबीन विकले तरीही २३ हजारांचाच धनादेश दिला जात होता. पुंजाजी जगताप यांनीही २५ क्ंिवटल सोयाबीन दिले तरीही अर्धवट रक्कम दिली जात होती. तर राहुल घुगे, गजानन घुगे, नीलावती बांगर, सचिन पवार, बबनराव खेडेकर आदींनी संदेश आल्यावर माल केंद्रावर आणून विक्री केला. त्यांची यादीत नावेच नाहीत.
हिंगोली येथे सोयाबीन उत्पादकांना अर्धवट चुकारे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:55 PM