नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी हे मंगळवारी दुपारी ४ वाजता औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये आले. तसेच वार्षिक तपासणीनिमित्त औंढा पोलीस ठाण्यात रंगरंगोटी करून विविध परिपूर्ण बाबी करण्यात आल्या होत्या. पाच जानेवारीला विशेष पोलीस महानिरीक्षक तांबोळी यांनी औंढा पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपस्थित होते. पोलीस महानिरीक्षक तांबोळी यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाणे तसेच प्रलंबित गुन्हे, दप्तर तपासणी करून औंढा पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी केली. त्याप्रमाणे विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांची तपासणी करून वाहने लिलावात काढण्याच्या सूचना दिल्या.
तसेच पोलीस ठाणे परिसराची पाहणी केली. पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. येत्या काळामध्ये कोण सेवानिवृत्त होणार आहे, त्यांनी सेवानिवृत्तीच्या काळामध्ये कोरोनापासून आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, असेही यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे आदी उपस्थित होते.