हिंगोली: सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने १८ फेब्रुवारी रोजी महिला व मुलींसाठी शिवसन्मान मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटामध्ये अश्विनी जाधव तर महिलांच्या गटात प्रियंका पाईकराव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात गुरुवारी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शिव सन्मान मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी छाया मगर, सुनीता मुळे, ज्योती कोथळकर, विद्या पवार यांच्यासह शिवप्रेमीची उपस्थिती हाेती. मुलींच्या गटामध्ये अश्विनी मदन जाधव (प्रथम), तन्वी गजानन कोरणे (द्वितीय), संस्कृती गजानन वऱ्हाड(तृतीय) तर प्रोत्साहनपर सायली अरुण शिंदे क्रमांक पटकाविला. महिला गटामध्ये प्रियंका दशरथ पाईकराव (प्रथम), कोमल मदन जाधव (द्वितीय), ज्योती शंकर गवते (तृतीय), परिमाला बालासाहेब मगर (प्रोत्साहनपर) यांनी क्रमांक पटकाविला. १९ फेब्रुवारीच्या मुख्य कार्यक्रमात विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.