हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९१.६१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत १६ हजार ३०० पैकी १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीतही मुलींनीच बाजी मारली.
हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेवटच्या स्थानी दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ८ हजार ६२८ मुले तर ७ हजार ६७२ मुली परीक्षेला बसले होते. यापैकी ८५१५ मुले तर ७५७९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. एकूण १६ हजार ९४ जणांनी परीक्षा दिली. यातील ७ हजार ४९७ मुले तर ७ हजार २४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण १४ हजार ७४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०४ टक्के तरी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६१ टक्के आहे. एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.
नियमित परीक्षा १५ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली. नियमितचा निकाल ९२.२२ टक्के लागला आहे. तर रिपीटर्सची ३२१ पैकी ३०५ जणांनी परीक्षा दिली. यात १८३ जण उत्तीर्ण झाली. यात ६० टक्के निकाल लागला आहे.
वसमतचा सर्वाधिक ९४.२६ टक्क्यांवरवसमत तालुक्यातून ४३०६ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ४२९१ जणांनी परीक्षा दिली. यात २१५८ मुले तर १८८७ मुली उत्तीर्ण झाल्या. ४०४५ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.०२ तर मुलींचे ९६.९६ टक्के आहे. एकूण निकाल ९४.२६ टक्के आहे.
सेनगाव, औंढा ९३ टक्क्यांवरसेनगाव तालुक्यात २३४१ जणांनी नोंदणी केली. तर २२९२ जणांनी परीक्षा दिली. यातील २१४५ उत्तीर्ण झाले. यात ११३८ मुले तर १००७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.५३ तर मुलींचे तब्बल ९७.२९ टक्के आहे. औंढा तालुक्यात नोंदणीकृत २०२३ पैकी २०१० जणांनी परीक्षा दिली. १८७५ जण उत्तीर्ण झाले.यात ७९७ तर मुली १०७८ उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.७५ तर मुलींचे ९६.०७ टक्के आहे.
कळमनुरीत ९१.२७ टक्केकळमनुरी तालुक्यात नोंदणीकृत ३२२४ पैकी ३१९९ जण परीक्षेला बसले. यातील २९२० जण उत्तीर्ण झाले. यात १४४५ मुले तर १४७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे ८७.२० तर मुलींचे ९५.६५ टक्के उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. एकूण ९१.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्वांत मागे हिंगोली तालुकाहिंगोली तालुक्यात नोंदणीकृत ४०८५ पैकी ३९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३५७६ जण उत्तीर्ण झाले. यातील १८३३ मुले तर १७४३ मुली आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८५.५३ तर मुलांचे ९४.०१ टक्के आहे.
४५६२ मुले विशेष प्राविण्यातहिंगोली जिल्ह्यातील नियमितच्या १५ हजार ९७९ पैकी १५७८९ जणांनी परीक्षा दिली. यातील ४५६२ विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले. ५१३२ मुले प्रथम श्रेणीत, ३८११ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १०५६ काठावर पास झाले. रीपीटरमध्ये २६ पैकी ५ प्रथम श्रेणीत, ९ द्वितीय श्रेणीत तर ७ फक्त उत्तीर्ण झाले.