लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : एस.टी. महामंडळाने १८ टक्के भाडेवाढ १६ जून रोजी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पासेसचे दरही वाढले. भाडेवाढीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.शालेय विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी एस.टी. महामंडळातर्फे प्रवास भाड्यात ३३ टक्के सवलत दिली जाते. भाडेवाढ झाल्यामुळे विद्यार्थी पासेसचे दरही वाढलेले आहे. येथील आगारात दर महिन्याला २ हजाराच्या जवळपास विद्यार्थी ये-जाण्यासाठी मासिक-त्रैमासिक बसचा पास काढतात. भाढेवाढीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. पूर्वी कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत विद्यार्थी पासेसचे दर ३८० रुपये होते. आता ते ५०० रुपये झाले आहेत. वाकोडी, मसोड, सांडस, चाफनाथ, शिवणी, माळेगाव, मोरवाडी, झरा, सालेगाव, रुपूर इ. ग्रामीण भागातून विद्यार्थी बसने कळमनुरी येथे शिक्षणासाठी येतात. पासेसचे दर वाढल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. ४ दिवसांच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा दरही ८५ रुपयांनी वाढला. वह्या- पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. परीक्षा फीमध्येही वाढ झालेली आहे. शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांना पासेसचे नवीन दर परवडणारे नाहीत. पासेसचे दर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन १४ जुलै रोजी आगार प्रमुख यांना अक्षय देशमुख, विश्वंभर पाटील, राजू मगर यांची स्वाक्षरी आहे.
एस.टी. पासेस भाडेवाढीचा शिक्षणावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:54 AM