लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानात २१ सप्टेंबर रोजी करण्यात आले. उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, गटशिक्षणाधिकारी सेनगाव उमेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.क्रीडा स्पर्धेत १४, १७, १९ या वयोगटातील मुली, २०० व मुले २५० सहभागी झाले आहेत. तालुक्यातील ३० शाळेनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विविध प्रकारे खेळ घेतले जाणार आहे. यामध्ये धावणे, रिले, लांब उडी, उंचउडी, तिहेरी उडी, फेकीमध्ये गोळा फेक, थाली फेक, भालाफेक अशा वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. तसेच जिल्हा स्पर्धेसाठी तालुक्याचे नेतृत्व सदरील संघातून निवडलेले संघ करणार आहेत.स्पर्धेसाठी क्रीडा संयोजक रामप्रसाद व्यवहारे, सुभाष जिरवणकर, रमेश गंगावणे, सुनील सुकाने, शिवाजी इंगोले, वैजनाथ गाडे, जाधव यांच्यासह शिक्षक व क्रीडा विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:17 AM