लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील ४ उपकेंद्रावरून राज्यसेवा पूर्व घेण्यात आली. एकूण ११४५ पैकी ८५५ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर २९० जण परीक्षेस गैरहजर होते.परीक्षा कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कायदा - सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून प्रशासकीय यंत्रणेकडून दक्षता घेण्यात आली. केंद्रात प्रवेश करणाऱ्या उमेदवारांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. त्यानंतरच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय भाग अ परीक्षा केंद्रात एकूण ३३६ परीक्षार्थीं पैकी २५७ जणांनी परीक्षा दिली. तर ७९ उमेवार गैरहजर होते. तसेच आदर्श महाविद्यालय भाग ब, ३१२ पैकी २२४ जणांनी परीक्षा दिली, तर ८८ गैरहजर होते. सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल २४० पैकी १८७ जणांनी परीक्षा दिली. ५३ उमेदवार अनुपस्थित होते. सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय परीक्षा केंद्रावरून २५७ पैकी १८७ परीक्षार्थी हजर होते. तर ७० जण गैरहजर होते. एकूण २९० उमेदवार गैरहजर होते. परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले होते.
राज्यसेवा पूर्व परीक्षा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:29 AM