छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करण्यात येताे. महाराष्ट्र शासनाने ११ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणुक न काढण्याचा आदेश काढला आहे. त्या आदेशाची होळी करून सरकारचा तीव्र निषेध करीत, मोर्चे, आंदोलने, बाजार, सार्वजनिक कार्यक्रम यांना शासन परवानगी देत आहे. कोरोनाचे निमित्त पुढे करून शिवरायांचे विचार दडपण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे या सरकारचा निषेध शिवप्रेमीच्या वतीने करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारी रोजी सर्व शिवप्रेमीच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या निवेदनावर विनोद बांगर, हरिष भोसले, योगेश संगेकर, ॲड. मनोज देशमुख, विलास पाटील, विश्वनाथ बोराळे, सागर भोसकर, रवी गाभने, सोनू वाढवे, अतुल पवार, सादिक पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन तहसीलदार मयुर खेगळे यांना देण्यात आले. फाेटाे नं. १५
शासनाच्या निषेधाचे शिवप्रेमीच्या वतीने निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:35 AM