मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांना दिलेल्या निवेदनात सेवानिवृत्ती वेतन कक्षात स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमून वेतनास होणारा विलंब थांबवावा, २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे अंशदानाची वाढीव रक्कम अदा करावी, कोरोनामुळे बंद झालेली पेन्शन अदालत नियमित सुरू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षकांची निवडश्रेणी प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, जिल्हास्तरावर पेन्शन कक्ष स्थापन झाल्याने पंचायत समिती स्तरावरील सर्व पीपीओ व इतर रेकाॅर्ड कक्षात मागवून घ्यावे. ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची वार्षिक वेतनवाढ मिळावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनोहर पोपळाईत, जिल्हा सरचिटणीस नामदेवराव कावरखे, जिल्हा उपाध्यक्ष बी. एम. शिंदे, तालुकाध्यक्ष बी. डी. लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पेन्शनर्स असोसिएशनचे सीईओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:19 AM