हिंगोली : कोरोना महामारीवर लस लाभदायक असून आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वतीने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची कसून तपासणी ही केली जात आहे. एवढेच काय विनामास्क फिरणाऱ्यांना दंड ही लावला जात आहे. एवढे कडक नियम असतानाही काही जण मात्र रस्त्याने फिरताना दिसत आहेत. कोरोना महामारीचा धोका ओळखून नागरिकांनी बाजारात विनाकारण व विनामास्क फिरु नये, अशा सूचना जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने दिल्या आहेत. लसीचा पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन हे दोन्ही डोस आतापर्यंत ८ हजार ६९७ जणांना दिले आहेत.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात कोणीही पॉझिटिव्ह नाही लसीकरणाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिला डोस आतापर्यंत ५२ हजार १२० जणांनी घेतला आहे. परंतु, कोणीही पॉझिटिव्ह आलेले नाही. लसीकरणानंतर ताप आल्यास आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. लस घेतल्यास ताप येतो पण लगेच उतरुनच जातो. उलट लस ही आरोग्यास लाभदायक आहे. काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
लस महत्त्वाचीच ; मृत्यूचा धोका कमी
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस महत्त्वाच्या आहेत. यामुळे मृत्यूचा धोका कमीच आहे. दोन्ही लस घेतल्यास आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे लाभदायक अशा आहेत. तेव्हा नागरिकांनी लस आवश्य घ्यावी.
दोन्ही डोसनंतर जिल्ह्यात केवळ ०.०३ टक्के पॉझिटिव्ह
दोन्ही डोस नंतर जिल्ह्यात ०.०३ टक्के पॉझिटिव्हचे प्रमाण आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणात आहे. अंग दुखणे, ताप येणे, डोके जड पडणे या समस्या कोणतेही इंजेक्शन घेतल्यानंतर येतच असतात. कोरोना महामारीला दूर सावरणारी लस आहे. लस घेण्यात कोणीही हयगय करु नये.
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्वत:ची व इतरांची काळजी करावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्याने करावा. बाजारात जाणे टाळावे. नागरिकांनी लसीकरण मात्र आवश्य करुन घ्यावे.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक