लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात जवळा-पळशी रोडवरील एक दुकान फोडून चाळीस हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्यांपैकी एकास गस्तीवरील पोलिसांनी पकडले आहे. हा मुलगा अल्पवयीन असून त्याचे इतर तीन साथीदार असल्याचे पोलिस तपासात आढळले.या प्रकाराबाबत हिंगोली शहर पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. यातील फिर्यादी बालाजी भिवाजी पडघन यांनी आपले मोटार रिवायंडिंग व दुरुस्तीचे दुकान नेहमीप्रमाणे बंद करुन घर गाठले. मात्र १२ रोजी रात्री अकरानंतर कुणीतरी त्यांचे दुकान फोडले. ही बाब त्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. ही बाब गस्तीवरील पोलिसांनाही कळविण्यात आली होती. त्यात पोलिसांना एक मुलगा साहित्यासह संशयास्पदरीत्या जात असल्याचे लक्षात आले. त्यांनी झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आढळून आला.याबाबत सपोनि सुधाकर आडे म्हणाले, संबंधिताचा ३७ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झाली आहे. गस्तीवरील कर्मचारी दिलीप बांगर व पांडुरंग डवले यांनी एका अल्पवयीन मुलास पकडले आहे. त्याचे इतर तीन साथीदार असल्याचे तो सांगत आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल. तसेच इतर काही चोºया केल्या का? हेही तपासत आहोत.
गस्तीवरील पोलिसांनी पकडला चोरीचा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:45 AM