शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
3
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
4
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
5
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
6
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
7
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
8
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
9
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
10
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
11
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
12
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
14
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
15
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
16
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
17
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
18
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
19
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
20
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

औंढ्यात कावड यात्रेवर दगड मारल्याने दोन गट आपसात भिडले;परिस्थिती नियंत्रणात, वाद मिटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 7:49 PM

तुंबळ हाणामारीत अनेक शिवभक्त जखमी झाले, काही वेळाने मिटला वाद

औंढा नागनाथ: वसमत तालुक्यातील गुंडा येथून मंदिराच्या उत्तर गेटवर आलेल्या कावड यात्रेवर दगड मारल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नागनाथ मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींची धरपकड सुरू केली आहे. शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झाले असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या शहरात शांतता आहे.

औंढा नागनाथ येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या ज्योतिर्लिंग असल्याने या ठिकाणी शिवभक्त मोठ्या प्रमाणात कावड यात्रा घेऊन येतात. वसमत तालुक्यातील गुंडा येथील कावड यात्रा दुपारी तीन वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून नागनाथ मंदिराकडे येत होती. दरम्यान, कावड यात्रेतील डीजेच्या तालावर नाचणाऱ्या टोळक्यामध्ये अज्ञाताने दगड मारला. यामुळे कावडमधील शिवभक्त संतप्त झाले.  त्यांनी दिसेल त्याला चोप दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. 

याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. त्यानंतर नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना शांत केले. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख दाखल झाले असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत आहेत. दरम्यान, सध्या तणाव निवळला असून गावकरी व कावड यात्रेमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात आला आहे. 

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी