शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:57 AM2018-11-07T00:57:24+5:302018-11-07T00:57:40+5:30
शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतकºयांच्या प्रश्नासह हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे दिला.
खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, प्रदेश सचिव अ.हफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना हिंगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा हे दोन तालुके वगळले. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे दुष्काळी सुविधांपासून त्यांना वंचित ठेवण्याचे काम शासनाने केले आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, ग्रामीण भागात कमी दाबाने वीज मिळत आहे. त्यामुळे डीपी जळण्याचे प्रमाण वाढले असून डीपीसुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. रबीची पेरणी शेतकºयांना करता येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर गतवर्षी ज्या शेतकºयांनी नाफेडला तूर आणि हरभरा विकलेला आहे. त्यांचे चुकारेही खात्यावर लवकरात लवकर जमा करावे, कर्जमाफीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून शेतकरी यापासून वंचित आहेत. सरसकट कर्जमाफी करावी व शेतकºयांचा सातबारा कोरा करावा दुष्काळग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत जाहीर करावी आदी निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, रमेश जाधव, श्यामराव जगताप, शंकरराव कºहाळे, बापूराव बांगर, ज्ञानेश्वर जाधव, केशव नाईक, विलास गोरे, माणिकराव करडिले, ऋषिकेश देशमुख, जुबेर मामू, बंटी नागरे, शासन कांबळे, अब्दुल्ला पठाण, अजहर पठाण आदींच्या स्वाक्षºया आहेत.