शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

अवैध धंद्यांविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:51 PM

तालुक्यातील कोळसा येथे खंडोबा यात्रा सुरु झाली आहे. यात्रेपासून काही अंतरावर सापडगाव शिवारात लोक कलेच्या नावाखाली दाखल झालेले तमाशा मंडळ देहविक्री करीत असल्याने या विरोधात कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे १ जानेवारी रोजी रास्ता रोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील कोळसा येथे खंडोबा यात्रा सुरु झाली आहे. यात्रेपासून काही अंतरावर सापडगाव शिवारात लोक कलेच्या नावाखाली दाखल झालेले तमाशा मंडळ देहविक्री करीत असल्याने या विरोधात कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे १ जानेवारी रोजी रास्ता रोको केला.कोळसा येथे पुरातन काळापासून यात्रा भरते, सदर यात्रेचे अनेक वर्षांपूर्वी सापडगाव शिवारातून कोळसा शिवारात स्थलांतर झाले होते. त्यामुळे या दोन गावात यात्रा भरण्यावरुन वाद सुरु आहेत. अशा स्थितीत मागील वीस वर्षांपासून कोळसा शिवारातील खंडोबा देवस्थानाजवळ यात्रा भरत आहे. परंतु यंदा यात्रा दोन ठिकाणी भरली असल्याने दोन्हीही गावात पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे.दोन गावातील वादामुळे दोन्ही ठिकाणी म्हणावे तसी यात्रा यंदा भरलेली नाही. अशा स्थितीत सापडगाव शिवारात यात्रेत दाखल झालेले तमाशाचे फड बंद करावे तसेच या दोन यात्रेतील वादात सेनगाव पोलीस ठाण्याचे पोनि मधूकर कारेगावकर यांनी दुहेरी भूमिका घेतल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी कोळसा येथील ग्रामस्थांनी सुकळी पाटी येथे सोमवारी सकाळी ९ ते २ या वेळात सेनगाव - रिसोड राज्य रस्त्यावर सहा तास रास्ता रोको केला.यावेळी तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात काँग्रेसचे भास्करराव बेंगाळ, सरपंच नारायण बेंगाळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यभान ढेंगळे, तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल, पुरुषोत्तम गडदे, अभिषक बेंगाळ, सय्यद लियाकत, ज्ञानेश्वर बेंगाळ, कैलास देवळे, परसराम पावडे, झनक बेंगाळ, जगन्नाथ वाव्हळ, रमेश तोंडे, वैजेनाथ तोंडे, काशीराम बेंगाळ, प्रल्हाद बोरकर, बबन गांजरे, राघोजी पावडे, भागवत वाव्हळ, विलास वाव्हळ आदी सहभागी झाले होते. आता आंदोलनानंतर तरी अवैध धंदे बंद होतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे.