लोकमत न्यूज नेटवर्कआडगाव रंजे : वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.बोरी सावंत गावातील गावठाणचे दोन रोहित्र गत दोन महिन्यांपासून जळाल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावातील नवीन रोहित्राचे कामे अपूर्ण झाले आहे. त्याबरोबरच सौभाग्य योजनेत मीटर बसविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी मागण्यांसंबंधी ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदने देऊनही समस्या सुटत नव्हती. त्यामुळे गावकरी मंडळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोलीचे उपकार्यकारी अभियंता अब्दुल जब्बार, वसमतचे वरिष्ठ अभियंता एस.एस. कादरी तसेच हट्ट्याचे कनिष्ठ अभियंता जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन रोहित्र बसवण्याबरोबरच इतर मागण्या पूर्ण केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामध्ये गावातील एका गावठाण रोहित्राचे काम ओपीडीसी योजनेंतर्गत रखडले होते. ते दोनच दिवसांत पूर्ण केले जाईल, गावातील दोन रोहित्र नादुरुस्त आहेत. आॅईल आल्यानंतर त्या रोहित्रांची दुरुस्ती करुन लवकरात लवकर देण्यात येईल, रोहित्राच्या दुरुस्तीबरोबरच केबल व किटकॅट बॉक्स लवकरच देण्यात येईल, सौभाग्य योजनेची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, बोरी उपकेंद्रात साहित्य देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात लवकरच पाठवण्यात येईल, हे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. या लेखी अश्वासनावर सरपंचासह पंचाच्या स्वाक्षºया आहेत. लगेच एक डी.पी. पाठवून दिला. तसेच शिल्लक कामे लवकर करण्याचे लेखी दिल्यामुळे गामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.यावेळी माणिकराव सावंत, रोहिदासराव सावंत, मदन कºहाळे, भगवानराव सावंत, तुकाराम सावंत, मुरलीधर सावंत, राजू सावंत, मुंजाजी सावंत, दादाराव क्षीरसागर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हट्टा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.ग्रामस्थांनी मागण्यांसाठी अनेकदा महावितरणला निवेदने दिली. त्याला महावितरणच्या अधिकाºयांनी केराची टोपली दाखवली, निवेदनांचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळेच मागण्या मान्य करुन घेण्यासाठी बोरी सावंत ग्रामस्थांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनस्थळी महावितरणचे अधिकारी दाखल झाल्यानंतर अधिकाºयांना घेराव घातला. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अन्यथा आंदोलनात अनुचित प्रकारही घडला असता.
विद्युत रोहित्रासाठी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:08 PM