लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : सूडबुद्धीने जिल्ह्यातील केवळ दोनच तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. जोपर्यंत या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होत नाही, तोपर्यंत भाजप-सेनेच्या मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले.शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉर्इंटवर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, जिंतूर औंढा, परभणी औंढा या राज्य महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या भिषण छायेत असताना चुकीचे निकष लावून औंढा नागनाथ व वसमत हे दोन तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळली आहेत. या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, शेतमाल हमीभावाने खरेदी करा, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, विजेचा प्रश्न, पीकविमा यासह आदी प्रश्नांचा शासनाला जाब विचारण्यासाठी खा. राजीव सातव यांच्या नेतृत्वात रास्तारोको केले. आ.डॉ संतोष टारफे, जिल्हाप्रभारी दादासाहेब मुंढे, संजय बोढारे, राकाँ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, राजू पाटील नवघरे, अब्दुल हाफीज, संजय दराडे, डॉ. सतीश पाचपुते, रमेश जाधव, बाबा नाईक, माणिक पाटील, ऋषिकेश देशमुख, प्रमोद देशपांडे, सुमेध मुळे, अलीम खतीब, संदीप गोबाडे, गजानन सांगळे, प्रवीण टोम्पे, प्रमोद गायकवाड, नंदकुमार पाटील, अझहर इनामदार, बाबूराव पोले, मनीष शिरसाठ, बालाजी हांडे, माणिकराव कर्डिले, मारोती बेले, अरुण देशमुख, गजानन सोळंके, बाबर सेठ, अनंत सांगळे, शकील अहमद, डॉ. काझी, मदन कºहाळे, सुरेश सराफ, श्यामराव जगताप, बापूराव बांगर, सतीश खाडे, अशोक सरनाईक, राजेश भोसले, विलास गोरे, डॉ. क्यातमवार, अजगर पटेल, शेख अलिमोद्दीन, शोभा मोगले, जुबेर मामू, बंटी नागरे, शासन कांबळे, शुभम सराफ आदींच्या उपस्थितीत सकाळी ११:३० च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी बोलताना खा. राजीव सातव यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. औंढा व वसमत तालुक्यात अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होऊनही तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळले आहे. शेतकºयांना या भिषण दुष्काळात मदतीची आवश्यकता असताना मदत तर सोडा जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही शेतकºयांना मिळाली नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना कर्जही दिले नाही. सोयाबीन, तूर व कपाशीवर विविध रोगांच्या प्रादुर्भावाने संपूर्ण पीक वाया गेले आहे. शेतकºयांनी त्यावर रोटावेटर चालविले. उत्पादन खर्च तर सोडा शेतकºयांच्या घरात एक दाणासुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती असताना भाजपा सरकारने वसमत व औंढा तालुके यादीतून वगळून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. शासनाने याची तत्काळ दखल घेऊन शेतकºयांना मदत जाहीर करावी अन्यथा भाजप, सेनेच्या मंत्र्यांना दोन्ही तालुक्यात प्रवेशबंदी करुन फडवणीस सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी खा. सातव यांनी दिला. यावेळी आ.संतोष टारफे म्हणाले, शेतकरी अडचणीत असतांना बँकासुद्धा शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. शेतकºयांचा कर्जपुरवठा बंद केलेल्या बँकांना कर्ज देण्याचा आदेश देऊन त्यांचे पतधोरण निश्चित करण्याची मागणी आ. टारफे यांनी यावेळी केली.सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी खचून गेले आहेत. या शेतकरी विरोधी धोरणाचा आम्ही धिक्कार करत आहोत, शेतकºयांच्या भावना लक्षात घेवून राज्य शासनाने मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल म्हणाले.सुमारे तीनतास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे हिंगोली, नांदेड, परभणी व जिंतूर रोडवर वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. परिसरातील शेतकरी बैलगाड्यासह आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग नोंदविला, नागेशवाडी येथील आत्महत्या केलेले शेतकरी शिवाजी कºहाळे यांना खा. राजीव सातव यांनी श्रद्धांजली वाहून कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आंदोलनास पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राहुल तायडे, वसमत पोलीस ठाण्याचे पोनि धुन्ने, अफसर पठाण आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:11 AM