बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:20 AM2018-12-24T00:20:56+5:302018-12-24T00:21:13+5:30

लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले.

 Strengthen Buddha's organization | बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय सचिव संपतकुमार व माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सचिव सत्संग मुंढे, जिल्हाप्रभारी दादासाहेब मुंढे, आ.संतोष टारफे, प्रदेशसचिव अ.हाफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, काँग्रेस नेते जकी कुरेशी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संपतकुमार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बुथ कमिट्यांचा आढावा व संघटनात्मक बांधणीची माहिती घेतली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकार विरोधातल्या खऱ्या लढ्याला गुजरात निवडणुकीपासुन सुरूवात झाली. त्यात खा.राजीव सातव यांचा मोठा वाटा होता. गुजरात निवडणुकीनंतर या लढ्याला नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत यश आले असून, काँग्रेसने तीन राज्य जिंकुन दाखविले. खा.राजीव सातव हे काँग्रेसचे देशपातळीवरील नेते आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व सर्वांनी जपले पाहिजे असे आवाहन संपतकुमार यांनी केले.
तसेच पक्षाच्या शक्ती अ‍ॅपची नोंदणी जास्तीत जास्त करावी व जनसंपर्क अभियान गावागावात जाऊन प्रभावीपणे राबवावी असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.संतोष टारफे, माजी खा.तुकाराम रेंगे, सत्संग मुंढे, दादासाहेब मुंढे यांची समयोचित भाषणे झाली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी तर संचालन धनंजय पाटील यांनी केले. आभार शामराव जगताप यांनी मानले. बाबा नाईक, सुरेशअप्पा सराफ, डॉ.एम.आर.क्यातमवार, विनायकराव देशमुख, शामराव जगताप, धनंजय पाटील, रमेश जाधव, शंकर कºहाळे, बापूराव बांगर, शोभा मोगले, अशोकराव सरनाईक, शेख नेहाल, शेख कलीम, सतीश खाडे, रवि पाटील गोरेगावकर, डॉ.राजेश भोसले, शेख नईम शेख लाल, विलास गोरे, शेख हबीब, ज्ञानेश्वर जाधव, नामदेव बुद्रूक पाटील, राजाराम खराटे, विक्रम पतंगे, एल.जी.घुगे, सुमेध मुळे, सतीश पाचपुते, भगवान खंदारे, संजय राठोड, श्रीराम जाधव, दत्तराव लोंढे, माबुद बागवान आदी हजर होते.

Web Title:  Strengthen Buddha's organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.