शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

हिंगोलीत जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:40 AM

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न ...

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये जीवनावश्यक व खादयान्न वस्तूवर जीएसटी नसावा, रिटर्न चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्याची तरतूद असावी, IGST ऐवजी CGST आणि SGST किंवा CGST आणि SGST ऐवजी IGST भरला गेला असेल तर करदात्याला तो समायोजित करण्याची तरतूद असावी, विविध प्रकारचे लेजर (CGST, IGST, SGST व्याज दंड) ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे, दोन महिने रिटर्न भरले नसले तर व्यावसायिकांचे ई- वे बिल करता येत नाही. त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होतो. वसुली आणि पुरवठा संबंधिताच्या अडचणी निर्माण होतात. नवीनच आलेल्या ई - वे बिलाची वैधता २४ तासात १०० किलोमीटर ऐवजी २०० किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत. सदर बाबतीत सुट्या, बंद, एकाच वाहनातून अनेक जागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीचे अधिकाऱ्यांमार्फत कोणतीही पूर्व सूचना अथवा खुलासा करण्याची संधी न देता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची तरतूद अन्यायकारक आहे. आधार कार्डवर आधारित नवीन नोंदणीसाठी तीन दिवस तर इतरांसाठी सात दिवस अशी कालमर्यादा बदलून ती सात दिवस आणि तीस दिवस करण्यात आलेली आहे. सदरचा बदल अनावश्यक आहे. पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदी दारावर येत आहे. ती तरतूद बदलावी, जीएसटी सोबत फूड सेफ्टी कायदा तसेच आयकर कायद्यातील काही तरतुदी प्रामाणिक व्यावसायिकांना अन्यायकारक असून त्यात बदल होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जीएसटीतील अन्यायकारक व किचकट तरतूदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनावर माजी आ. गजाननराव घुगे, नंदकिशोर तोष्णीवाल, मयूर कयाल, अनिल नैनवाणी, कैलाश काबरा, प्रशांत सोनी, संजय देवडा, सुमीत चौधरी, जगजीतराज खुराना, पंकज वर्मा,रमेशचंद बगडीया, इंदरचंद सोनी, धरमचंद बडेरा, हाजी एकबाल, सुभाषचंद्र काबरा, मनोज आखरे, रत्नदीपक सावजी, गजानन कानडे, द्वारकादास झंवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो आहे.