लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : स्थळ पाहणी रिपोर्टच्या नक्कलेची मागणी करण्याच्या कारणावरून कळमनुरी न. प. येथील क्षेत्रीय अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षकास थापड-बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्षेत्रिय अधिकारी न. प. कळमनुरी राजू अशोक साळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रियाज नाईक वली नाईक रा. नाईकवाडी मोहल्ला कळमनुरी याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षेत्रिय अधिकाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:54 PM