लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम श्री गजराज बालगणेश मंडळातर्फे राबविले जात आहेत. यावर्षी मंडळाच्या वतीने रामचरित्र मानस यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला.हिंगोली येथील पोस्ट आॅफीस रोडवरील श्री गजराज बाल गणेश मंडळाला अनेक पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. चिमुकल्यांवर योग्य संस्कार व्हावेत, या उद्देशाने यावर्षी मंडळाने स्पर्धा परीक्षा घेतली. गजराज बाल गणेश मंडळाची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली. त्यानंतर गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. मंळडाचे सर्व पदाधिकारीही सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतात. वृक्षारोपनातील १०० पैकी ८० रोपांचे संरक्षण मंडळाने केले. दरवर्षी गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पंचपक्वानाची मेजवाणी दिली जाते. शहरासह ग्रामीण भागातील भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
संस्कृती जपण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:14 AM