शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक, वार्डनच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 5:46 PM

मुख्याध्यापक, अधिक्षिकेस निलंबित करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या निवासी शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी शिवानी सदाशिव वावधाने हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु, आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना तातडीने अटक करून निलंबित करावे या मागणीसाठी आज दुपारी आदिवासी पँथर संघटनेच्यावतीने बाळापुर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

दहाव्या वर्गात शिकणाऱ्या शिवानी वावधाने या मुलीने 21 जुलै रोजी शाळेच्या वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षिका यांच्याविरुद्ध कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेला आठ दिवस उलटले असले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आले नाही, आरोपी खुलेआम मोकाट फिरत आहेत,पोलीस आरोपींना वाचवत आहेत, असा आरोप करत आदिवासी पॅंथर संघटनेच्यावतीने आज दुपारी बारा वाजता मोर्चा काढून पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्यात आले. 

हा मोर्चा कॄषि उत्पन्न बाजार समिती मैदानावरून निघून पोलीस ठाण्यावर दाखल झाला. मोर्चात मोठ्याप्रमाणात महिला-पुरुष सहभागी झाले होते. आदिवासी पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माधवराव बोडके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. त्यांनी ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांना निवेदन सादर करून मयत मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत तपास योग्य दिशेने सुरू असून यातील सत्य लवकरच बाहेर येईल असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. 

आंदोलकांनी थेट पोलीस ठाण्यात मोर्चा काढून न्यायाची मागणी केल्याने बाळापूर परिसरात मोर्चाची चर्चा होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानाजवळ आंदोलनकर्ते जमा झाले. त्यांनी बाळापुर ठाण्याकडे कुच करत असताना पोलिसांचा निषेध करण्यासाठी आणलेले काळे ध्वज पोलिसांनी जप्त केल्याचा आरोप आंदोलक खंदारे यांनी केला.

टॅग्स :HingoliहिंगोलीagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारी