लोकमत न्यूज नेटवर्ककडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील दहापैकी तीन शिक्षकांना मतदार यादी पुनरिक्षणाचे काम दिले आहे. तर काही शिक्षक कामाचा ताण वाढल्याने सुट्टी घेत आहेत. त्यामुळे शाळा मात्र वाºयावर सोडली जात असल्याचे चित्र आहे.काही नवीन शिक्षक बीएलओ असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कामात फिरवत आहेत. तर यामध्ये विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे तर नुकसान आहेच पण या कामात विद्यार्थ्यांना विनाकारण फिरवत आहेत. तसेच शाळेत काही शिक्षक शाळेच्या बहाणा करून मिटींग, तहसीलचे काम, जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयाचे कामे दाखवून जात आहेत. तर काही शिक्षक दोन तीन वर्गाचे विद्यार्थी एकाच वर्गात बसवून अध्यापनाची कवायत करीत आहेत. पहिली ते सातवीपर्यंत शाळा असल्याने केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक काढता पाय घेताना दिसत आहेत.
बीएलओच्या कामात विद्यार्थी वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:05 AM