हिंगोली : दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनात येणार्या अडचणी समजून घेत ते अभ्यासक्रमात मागे न राहता त्यांचा बौद्धीक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष गरजा असणार्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष शिक्षक शाळेत जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन पद्धतीत येणारे आव्हाने व त्यावरील उपाय-योजना याबबात मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीत एकूण ४ हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार्या अडचणींचा शोध घेऊन त्यांना नेमके काय शिकवायला हवे, त्यांचा प्रथम अध्ययन-अध्यापन स्तर निश्चित केला जात आहे. त्यानंतरच विशेष गरजा असलणार्या या विद्यार्थ्यांना आवश्यक क्षमतेनुसार शिक्षण दिले जात आहे. १० पेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थी असणार्या जि. प. च्या शाळा ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाभरातील जि. प. च्या शाळांत हा उपक्रम राबविला जात असून २८ विशेष शिक्षक दिव्यांगांच्या अध्ययनस्तर निश्चितीसाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांकडे वैद्यकीयदृष्ट्या न पाहता, त्यांच्याकडे शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहावे व त्यांना अभ्यासात येणार्या अडीअडचणी, समस्या समाजावून घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षकांची कार्यशाळासमावेशित शिक्षण अंतर्गत विषयतज्ज्ञ व विषय शिक्षकांची दोन दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन पद्धतीत येणारे आव्हाने व त्यावरील उपाय-योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, विभागप्रमुख नाईकनवरे, जिल्हा समन्वयक मंगनाळे आदी उपस्थित होते.