शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

क्षेत्र नोंदणीकरिता प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:41 AM

रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाºया बीजोत्पादन कार्यक्रमांचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीजप्रमाणीकरणे यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा ठरविण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाºया बीजोत्पादन कार्यक्रमांचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीजप्रमाणीकरणे यंत्रणेकडे सादर करण्याच्या पीकनिहाय अंतिम तारखा ठरविण्यात आल्या आहेत.करडई व रब्बी ज्वारी पिकासाठी ३१ आॅक्टोबर, हरभरा पिकासाठी २० नोव्हेंबर, तर गहू व इतर पिकांसाठी १५ डिसेंबर या अंतिम तारखा असणार आहेत. सदर तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांत करता येणार आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तसेच क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाºयांसह करण्यात येणार ५०० रूपयांच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्यांचे मूळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बीयाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकºयांच्या स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहित अर्ज, बीजोत्पादकाचे महसूली दस्ताऐवज सातबाराव व ८ अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बीजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बीयाणे वाटप अहवाल, गाव, पिक व दर्जा निहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या ४ प्रतीत कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे. याकरीता क्षेत्र नोंदणी ५० रूपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी फी पायाभूत बीजोत्पादनाकरिता २०० रूपये प्रतिएकर व प्रमाणित बीजोत्पादनाकरिता १५० रूपये प्रतिएकर याप्रमाणे आहे.सविस्तर माहितीसाठी जिल्हास्तरीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन बीज प्रमाणिकरण यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी