स्पर्धेमध्ये सहाशे किलोमीटर प्रवास चाळीस तासांत पूर्ण करायचा होता. यामध्ये जवळाबाजारच्या तीन स्पर्धकांनी हा प्रवास पूर्ण करून यश मिळवले आहे. वाशिम येथे ॲडक्स इंडिया क्लबच्या वतीने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहाशे किलोमीटर प्रवास ४० तासांत पूर्ण करावयाचा होता. यामध्ये वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांडुर्णा (मध्य प्रदेश), सावनेर (महाराष्ट्र) आणि परत सावनेर ते पांडुर्णा (मध्य प्रदेश), वरुड, मोर्शी, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, वाशिम असा स्पर्धेचा प्रवास होता.
स्पर्धेसाठी हिंगोली, औरंगाबाद, वाशिम, अमरावती, नागपूर जिल्ह्यातील १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा पूर्ण करण्याचे यश १४ स्पर्धकांनी पूर्ण केले. यामध्ये जवळाबाजार येथील तीन स्पर्धकांनी यश मिळविले. चाळीस तासांत सहाशे किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये जवळाबाजार येथील व्यापारी नीलेश सोनी, डॉ. राजकुमार भारूका, विवेक शिंदे यांनी अंतर वेळेत पूर्ण केले. त्यांच्या यशामुळे परिसरात ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
फोटो १६ नंबर सायकल फोटो