औंढा नागनाथ (हिंगोली) : तालुक्यातील शिरड शहापुर येथे एका दिव्यंग तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 3.30 वाजता घडली. रितेश रमेशराव सप्ताळ (३०) असे मयत तरुणाचे नाव आहे.
रितेशला जन्मापासूनच दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते. मात्र तो स्वतःची कामे स्वतःच करत होता. त्याच शिक्षण ब्रेन लिपीतून झाले होते. तसेच तो एकटाच विविध ठिकाणी जात असे. मात्र आज दुपारी अचानक त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने शिरडशहापूर येथे एकच खळबळ उडाली आहे. घटनासाठी सपोनि शंकर वाघमोडे हे इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा सुरू आहे