हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया शासनाच्या सूचनेनुसार कोरोना काळात बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोना काळातही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पाडत महिलांची देखभाल केली. गरोदरपणात कोणतीही इजा न होता गतवर्षी २७७ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या. आठ-पंधरा-वीस दिवसांपासून नियमितपणे शस्त्रक्रिया सुरू झाल्या असून, त्या यशस्वीपणे तज्ज्ञ डॉक्टर पार पाडत आहेत.
२०२०-२१ या वर्षात एप्रिल ते मार्च या कालावधीत मिनीलॅप पीएल १८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याचबरोबर ९२ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २०२०-२१ मध्ये ८ शिबिरे तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेसाठी ४ शिबिरे घेण्यात आली होती.
गरोदरमातांची घेतली जातेय काळजी
जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण पाठविले जातात. महिलांबरोबर सर्व रुग्णांची व्यवस्थितरीत्या काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे गरोदरमातांची व्यवस्थितरीत्या देखभाल करत काळजी घेतली जाते.
कोरोनानंतर ओपीडीसमोर रुग्ण...
कोरोना काळात शासनाच्या सूचनेनुसार शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आला होता. पण अतिगंभीर रुग्ण असेल तर त्याची शस्त्रक्रियाही त्याकाळात केली आहे. बऱ्याच दिवसांनी आता ओपीडी सुरू झाली असून, रोजच्या रोज रुग्णांची तपासणी केली जात आहे.
औषधी आणावी लागतात बाहेरून...
जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात शस्त्रक्रिया चांगली असली होत असली तरी काही औषधी मात्र बाहेरून विकत आणावी लागत आहे. खरे पाहिले तर भरती झालेल्या रुग्णाला बाहेरून औषध आणायची वेळ येऊ देऊ नये.परंतु, ती वेळ अनेक रुग्णांवर येत आहे, असे एका महिलेच्या नातेवाईकाने सांगितले.
नातेवाइकांसाठी शेड उभारावे...
कोरोनाकाळात शस्त्रक्रिया विभाग बंद होता. त्यामुळे अतिगंभीर रुग्णाला नांदेड व इतर मोठ्या शहराच्या ठिकाणी न्यावे लागले. बऱ्याच महिन्यानंतर शस्त्रक्रिया विभाग सुरू झाला झाला आहे. त्यामुळे पर जिल्ह्यात जाण्याची गरज राहिली नाही, असे एका नातेवाईकाने सांगितले.
जिल्हा रुग्णालय गरिबांसाठी आहे, असे शासन सांगते. परंतु, गरोदरमातांसोबत आलेल्या नातेवाइकांना येथे बसण्याची व राहण्याची सोय नाही. रुग्णालयाच्या समोर मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी शासनाने पत्राचे शेड उभारण्यास बरे होईल. शेड उभारल्यास नातेवाइकांचा लॉजचा खर्च वाचेल.
प्रतिक्रिया
कोरोनाकाळातही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच अतिगंभीर रुग्णांवर उपचार केले आहेत. परंतु, काही दिवस शासनाच्या आदेशानुसार शस्त्रक्रिया बंद होत्या. आजमितीस कोरोना महामारी ओसरत चालला असून, शस्त्रक्रियाही सुरू केल्या आहेत. सर्व महिला रुग्णांची देखभालही चांगल्या पद्धतीने केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्ण घेऊन येणाऱ्या नातेवाइकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
शासन रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार ०
शासकीय रुग्णालयात सध्या रिकामे झालेले बेड्स २१०