शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; तब्बल ३० तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:08 PM

Murder In Hingoli "बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जमले नातेवाईक

ठळक मुद्देसासरच्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : हदगाव तालुक्यातील मरडगा येथील एका विवाहितेला आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर माहेरच्यांनी तिचा खून झाल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मोठा अवघड प्रसंग निर्माण झाला. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले. यानंतर अखेर हदगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच तब्बल ३० तासांच्या कालावधीनंतर माहेरच्यांनी मयत महिलेचे प्रेत ताब्यात घेतले आहे. ( Suspicious death of a married woman; After 30 hours, the relatives took the body into custody and a case was registered) 

कळमनुरी तालुक्यातील भोशी येथील गायत्री हिचा विवाह मरडगा येथील संजय काळे याच्याशी पंधरा महिन्यांपूर्वीच झाला. या कालावधीत त्यांचे घरात वाद निर्माण झाले. अशातच ११ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वाजता गायत्री संजय काळे (वय २२) हिला सकाळी अंगण झाडून काढताना चक्कर येत ती बेशुद्ध झाली असल्याचे सांगत सासरच्या मंडळींनी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या माहेरच्यांना ही खबर मिळताच ती मंडळी दवाखान्यात आली. सासरच्या मंडळींशी वाद झाल्याने सासरची मंडळी तिला तसेच सोडून निघून गेली. यानंतर बाळापूर ठाणेदार पी.सी. बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, हनुमंत नकाते, जमादार संजय मार्के दवाखान्यात दाखल झाले.

हेही वाचा - कोल्ड बल्डेड मर्डर ! प्रियकर आणि मुलाच्या मदतीने विहिरीत बुडवून संपविला पती 

संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांना समजावून सांगण्याचे प्रयत्न केले; परंतु महिलेचा खून झाला आहे. तिचे शवविच्छेदन हे छायाचित्रीकरणात व्हावे, असा त्यांनी हट्ट धरला. सदर घटना हदगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली असल्यामुळे तिथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी ही मंडळी हदगावला गेली; परंतु शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच गुन्हा दाखल करू, असा सल्ला हदगाव पोलिसांनी दिला. रात्री उशिरापर्यंत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचा प्रयत्न झाला; परंतु बाळापूरच्या ग्रामीण दवाखान्यात ती सोय नसल्याचे सांगण्यात आले. अखेर दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शवविच्छेदन झाले. यात तिच्या डोक्याला मार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्री ३ वाजता पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी सदर माहिती हदगाव पोलीस ठाण्यास कागदपत्रांसह सुपूर्द केली. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी तब्बल ३० तासांच्या कालावधीनंतर महिलेचे प्रेत ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच माहेरची मंडळी यासाठी तयार झाली. तब्बल दोन दिवस महिलेचे प्रेत बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पडून होते. यासाठी बाळापूर पोलिसांची मात्र मोठी फजिती झाली.

नवरा, सासू, सासऱ्यासह ५ जणांवर खुनाचा गुन्हायाप्रकरणी माहेरचे नातेवाईक रामदास बबनराव अवचार (रा. भोशी, ता. कळमनुरी) यांच्या फिर्यादीवरून मरडगा, ता. हदगाव येथील रहिवासी पती संजय दत्तराव काळे, सासरे दत्तराव काळे, सासू कौशल्या दत्तराव काळे, दीर राजू दत्तराव काळे, जाऊ गोदावरी राजू काळे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत मयत गायत्री संजय काळे (माहेरचे नाव- सगुना विश्वनाथ पुंड) हिचा माहेराहून मामाकडून पैसे घेऊन ये म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारले असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय फोलाते करत आहेत.

हेही वाचा - शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली