लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : वॉटर कप स्पर्धेसाठी गावागावात आता श्रमदानासाठी जुंपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या कामा सहभागी वाढविला आहे. भुरक्याची वाडी येथे तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सकाळी सात वाजताच हजेरी लावत माळरानावरील खोदकामात हातात फावडे टिकास घेऊन श्रमदान केले.कळमनुरी तालुक्यातील गावागावात पाणी पाऊंडेशनच्य स्पर्धेअंतर्गत कामांना प्रारंभ झाला आहे. भुरक्याची वाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने प्रदर्शन करत श्रमदान हिरीरीने भाग घेतला. ग्रामसेवक माळोदे यांनी कामाचे नियोजन करून पूर्णवेळ ग्रामस्थासोबत कामात सहभाग व मार्गदर्शन सुरू केले. जि.प. सदस्य डॉ. सतीश पाचपुतेसह इतर पदाधिकाºयांनी वेळोवेळी कामात सहभाग नोंदविला. गावाचे काम अग्रेसर असल्याने प्रशासकीय अधिकाºयांनीही कामास भेटी देऊन मार्गदर्शन केले. तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी १४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच गावात हजेरी लावली. माळरानावर माथा ते पायथा सुरू असलेल्या डीप सीसीटीच्या कामात सहभाग नोंदवत हातात कुदळ, फावडे घेतले.केवळ फोटोसेशन न करता दोन तास श्रमदान केले. त्यांच्या या श्रमदानामुळे ग्रामस्थांना प्रेरणा मिळाली व कामाची गती वाढली.
तहसीलदारांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:02 AM