लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : नगर पालिकेत झालेल्या साडेअकरा कोटीच्या घोटाळा दडपण्याचे प्रयत्न होत असल्याने न.प.चे कर्मचारी पुन्हा धरणे आंदोलनासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. सोमवारपासून आझाद मैदानावर आंदोलनास प्रारंभ होणार आहे. घोटाळ्यातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कर्मचाºयांची मागणी आहे. शासनाच्या निधी गैरमार्गाने खर्च झाल्याच्या प्रकरणास नगरविकास मंत्रालयही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.वसमत नगर पालिके शासनास खोटी माहिती पुरवून सहाय्यक अनुदानाचे साडेअकरा कोटी रुपये जास्त अनुदान प्राप्त करून घेतले. ज्यादा आलेले अनुदान शासनाला परत न करता गैरपद्धतीने खर्च करून रक्कम संपवली. कर्मचाºयांच्या वेतनासाठीच अनुदान गुत्तेदारांची बिले, झेरॉक्सची लाखो रुपयाची बोगस बिले. शासनाकडून दुसरा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गणी भरण्यासाठी हा निधी वापरण्यात आला. गुत्तेदाराची बिले काढण्यावर शासनाचा निधी वापरून अनेकांची घरे भरण्यात आली. या गंभीर प्रकरणाची शासनाकडून चौकशी झाली. दोषी कोण हे स्पष्ट झाले मात्र आजवर या घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई काही झाली नाही. शासनाच्या निधीचा गैरवापर करणाºया विरोधात कारवाई व्हावी, यासाठी न.प. कर्मचारी संघटनेने वेळोवेळी आंदोलनही केले. मंत्रालयासमोर उपोषणे झाली. वेळोवेळी आश्वासनाशिवाय पुढे काही झाले नाही. सहाय्यक अनुदानाच्या गैरमार्गाने खर्च झाल्याचा प्रकाराने न.प. कर्मचाºयांना वेतन मिळणे कठीण झाले. अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले असून कर्ज, विम्याचे हप्ते असा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कर्मचाºयांचा पाठपुरावा संपवण्यासाठी कर्मचाºयांचे वेतन नियमीतचा प्रयत्न झाला. मात्र अद्याप सहाय्यक अनुदानातून कपात सुरूच आहे. या प्रकरणाने कर्मचारी त्रस्त आहेत.लाखो रुपये झेरॉक्सवर खर्च झाले एवढ्या झेरॉक्स कशाच्या काढल्या याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार कर्मचारी संघटनेने केला आहे. वसमत येथील न.प.ने कर्मचारी युनीयन (लालबावटा) पदाधिकारी व कर्मचारी रविवारी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सोमवारपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. आता या अधिवेशनात तरी सहाय्यक अनुदानाच्या घोटाळ्यावर व घोटाळा करणाºयांवर कारवाई होईल, अशी आशा आहे.कोट्यांवधीचा घोटाळा करून स्वत:ची घरे भरणाºयांवर गुन्हे दाखल होईपर्यंत व कर्मचाºयांना वेठीस धरणाºयांवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहिल. असे संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, बी.एम. वाघमारे, गायकवाड आदींनी सांगितले. शासनाच्या चौकशी अहवालात दोषी अधिकारी, कर्मचारी निष्पन्न झाल्यानंतरही कागदी घोडे नाचवल्याशिवाय कोणतीच कारवाई होत नसल्याने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे प्रकार मुंबई स्तरावरूनही सुरू असल्याचे चित्र आहे.
‘न.प.च्या घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:17 AM