लोकमत न्यूज नेटवर्ककौठा: वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या या परिसरात सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात एक वाघ बकरीला घेऊन जात असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ वसमत परिसरातील असल्याची चर्चा असल्याने आणखी भीती वाढली आहे. कौठा परिसरातील कौठा, बोराळा, मोहगाव व धामणगाव येथे तर शेतकरी भीतीच्या पोटी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहे.मोहगाव येथे ऊस तोडणी करणाºया कामगारांनी रात्रीच्या वेळी वाघ बघितल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या परिसरात तीन शेळ्या वाघाने फस्त केल्याची अफवाही जोरात पसरत असून, त्यास शेतकरी मात्र दुजोरा देत आहेत.याबाबत बोराळा येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. गवई यांनी सांगितले की, शेतकºयांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात जावून पाहणी केली असता हिंस्र पशुनेच या शेळ्या फस्त केल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. या सर्व प्रकाराबाबत प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वसमत यांच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता सदरील कार्यालयातही याबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच वनपाल रूमाले हे पथकासह दोन दिवसांपासून या परिसरात शोध घेत आहेत.मोहगाव परिसरात बिबट्याच्या काही खुणा व ठसे आढळून आले असल्याचे सांगितले. तसेच वाघ किंवा बिबट्या हा एका रात्रीत सरासरी ४० मैल अंतर चालू शकत असल्यामुळे एकाच ठिकाणी असण्याची शक्यता फार कमी असल्याचेही सांगितले.याबाबत वसमतचे वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी. कच्छवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत वनविभागाकडून माहिती घेण्यात येत असून मागील चार दिवसांपूर्वी या परिसरात ‘तडस’ या हिंस्त्र प्राण्याची काही पिल्लं सापडली आहेत व परिसरात वाघ, बिबट्या की इतर हिंस्र पशु आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.तो वाघाचा व्हिडीओ खोटा आहे- वाबळेहिंगोली जिल्ह्यात वाघ आल्याचा जो व्हिडीओ सोशल मिडिया, व्हॉट्सअॅवर फिरतो तो मुळात चुकीचा आहे. त्यावर कोणीती विश्वास ठेवू नये, तसेच वाघासाठी ५ ते ७ हजार हेक्टर जंगल असणे अपेक्षित आहे. शिवाय तेथे सर्व प्रकारचे प्राणी असणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात २९ हजार हेक्टर जंगल आहे. मात्र इतर प्राणी नसल्याने वाघ येथे राहुच शकत नाही. मात्र जिल्ह्यात तीन बिबटे आहेत. त्यांनाही काही घाबरण्याचे कारण नाही. एवढेही करुन बिबट्या आढळलाच तर वन विभागाशी संपर्क साधावा काही वेळात त्या गावामध्ये वनविभागाचे कर्मचारी दाखल होऊन बिबट्याला शोधून काढतील, असे विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.
वाघ असल्याच्या चर्चेने कौठ्यात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:48 PM
वसमत तालुक्यातील कौठा, मोहगाव, बोराळा, धामणगाव परिसरात सध्या वाघाची दहशत पसरली असून, वाघ असल्याच्या चर्चेने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देकौठा परिसरात ग्रामस्थ हैराण : वनविभागाला आढळली तडसाची पिले